
खरीप हंगाम २०२५ साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके मिळावी, यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने आता दमदार पावले उचलली आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १४ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, यात प्रत्येक तालुक्यासाठी १ आणि जिल्हास्तरावर १ भरारी पथकाचा समावेश आहे.

दरम्यान २०२४-२५ मध्ये बोगस बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री केल्याप्रकरणी ३५० परवाने रद्द करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळू नये, याची खबरदारी कृषी विभागाच्या वतीने घेण्यात येते, तसेच जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे.

यावर्षी खरीप हंगामापूर्वीच पथके स्थापन करण्यात आली असून या पथकांच्या माध्यमातून नियमित कारवाई करण्यात येते.

२०२४-२५ मध्ये पथकांच्या माध्यमातून विविध कृषी निविष्ठांचे एकूण दोन हजार १६२ नमुने तपासणीसाठी घेतले गेले आहेत.