बैलाचा ‘मुळशी पॅटर्न’! थेट कारशी पंगा, चालू गाडी शिंगावर… काय घडलं? मजेदार Photo पाहाच

रस्त्याच्या शेजारी असलेल्या बैलाचा चालू कारशीच पंगा! जीव मुठीत घेऊन बसलेल्या कार चालकाच्या मदतीची कशी प्रकारे सुटका करण्यात आली, नेमकं काय घडलं? एकाद नक्की जाणून घ्या...

| Updated on: Nov 15, 2025 | 1:46 PM
1 / 5
पुण्याच्या मुळशीतील माण-घोटवडे रस्त्यावरील बापूजीबुवा घाटात मोठा थरार पहायला मिळाला. एका मोकाट बैलाने अचानक चारचाकी गाडीला अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कारचालक पूर्णपणे घाबरलेला असताना समोर आलेली ही जीवघेणी परिस्थिती गंभीर बनली होती. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. आता नेमकं काय झालं होतं जाणून घ्या...

2 / 5
रस्त्याची शेजारी असलेल्या बैलाने एका कारवर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने कारची पुढची हेडलाइट फोडण्याचा प्रयत्न केला. बैलाने केलेला हल्ला पाहून कार चालक घाबरला होता. आता नेमकं काय करावं असा प्रश्न त्याला पडला होता. कार चालक गाडी बंद करुन आत थांबला होता. बैल काही केल्या तेथून जात नव्हता. तो गाडीवर एका बाजूने हल्ला करत राहिला.

3 / 5
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने वाहनचालकाला वाचवण्यासाठी जवळच असलेल्या ट्रॅक्टर चालकाला बैलाला दूर करण्याची विनंती करण्यात आली. मात्र ट्रॅक्टरचालक भीतीमुळे पुढे येण्यास तयार नव्हता. अखेर प्रसंगावधान राखत बाबाजी शेळके यांनी स्वतःच ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हाती घेतले. शेतकरी आणि अनुभवी ट्रॅक्टर चालक असल्याचा अनुभव वापरत त्यांनी हळूहळू ट्रॅक्टर बैलाच्या दिशेने नेला आणि त्याला चारचाकी वाहनापासून दूर हुसकावून लावले.

4 / 5
त्यामुळे कारचालकाचा थरारक प्रसंगातून सुटका झाली. वेळ आली होती, पण काळ आला नव्हता याची प्रचिती त्या कारचालकाला स्पष्ट जाणवली. दरम्यान, या परिसरात मोकाट जनावरांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत असून अनेक वेळा वनविभागाला कळवूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी बाबाजी शेळके यांनी व्यक्त केली.

5 / 5
त्वरित लक्ष न दिल्यास एखादा मोठा अनर्थ घडू शकतो, त्यामुळं या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.. अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी ट्रॅक्टर चालकाने उचललेल्या पाऊलाचे कौतुक केले आहे. तर काहींनी मोकाट जनावरांवर प्रश्न उपस्थित केला आहे.