
Business Idea: इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. स्मार्ट मोबाईल आणि हायस्पीड इंटरनेटमुळे शिक्षणाचे, कमाईचे स्वातंत्र्य मिळत आहे. पण अनेक जण केवळ सोशल मीडियावर वेळ घालवतात. तर काही जण रील्स स्क्रोल करण्यात दिवस घालवतात. विद्यार्थ्यांना फ्रीलान्सिंगच्या संधीतून शिक्षणासोबत कमाई करता येते. त्यासाठी कौशल्य, इंटरनेट आणि काम करण्याची सांगड घालावी लागेल.

फ्रीलान्सिंगचा अर्थ स्वातंत्र्याने काम करणे असा आहे. तुमच्या क्लाईंटसोबत मिळून तुम्ही त्यांच्या प्रकल्पानुसार काम करू शकता. पैसे आकारू शकता. तुमचे कौशल्य आणि कामाची पद्धत त्यांना आवडली तर पैसा, अनुभव आणि शिक्षण हे सहज होऊ शकते. तसेच त्या क्षेत्रात तुम्हाला अधिक संधी आणि अधिक पैसा मिळू शकतो.

यामध्ये कंटेंट रायटिंग, ग्राफिक्स डिझाईनिंग, व्हिडिओ एडिटिंग,सोशल मीडिया मॅनजेटमेंट, बेसिक प्रोग्रॅमिंग, ट्यूशन घेणे अशा फ्रीलांसिंगच्या संधी आहेत. सुरुवातीला या गोष्टी तुम्ही ऑनलाईन शिकू शकता. तुमचे कौशल्य वाढल्यानंतर कामाचे काही सॅम्पल तयार करुन सुरुवातीला काही प्रकल्प मिळवू शकता. नंतर हळूहळू कमाई वाढेल.

फ्रीलान्सिंगमुळे आत्मविश्वास वाढतो. संवाद कौशल्य वाढते. कौशल्यात भर पडते. जगातील घाडमोडींच्या आधारे अजून काय करता येईल याचा दृष्टिकोन विकसीत होतो. तर शिक्षण करतानाच या गोष्टी शिकल्यामुळे योग्य वयात कमाईसाठी कंपन्यांचे दार ठोठावे लागत नाही. नोकरीसाठी जागोजागी जावे लागत नाही. तुम्ही तुमच्या आवडी आणि सवडीनुसार कमाई करू शकता.

आजच्या डिजिटल युगात व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मोठा खर्च करण्याची गरज नाही.झिरो इन्व्हेस्टमेंट आयडियाज द्वारे तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकतात. तुमच्याकडे असलेल्या साधनांमधून करता येऊ शकतात. त्यासाठी अर्थातच तुमचं कौशल्य, वेळ, कष्ट आणि सातत्याची अत्यंत गरज आहे. त्यासाठी काही ऑनलाईन गोष्टी लागतील.

अनेक लोक घरातूनच विविध प्रकारचे व्यवसाय करतात. त्यातून त्यांची चांगली कमाई होते. अनेक महिलांना ऑफिसची झंझट नको असते. त्यांना घरातूनच काहीतरी व्यवसाय सुरू करावा वाटतो. नोकरीमुळे ओढताण होते. त्यापेक्षा घरातील व्यवसायातून कमाई करता येऊ शकते. महिलांना या छोट्या बिझनेसमधून घरातूनच व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. कमी बजेटच्या या व्यवसायातून त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात.