
Lactose Intolerant असणारे तुमचे मित्र मैत्रिणी, नातेवाईक देखील असतील. त्यांना दूध सहन होत नाही. मग अशा लोकांसाठी कॅल्शियम साठी काय पर्याय आहे? कॅल्शियम खाण्यासाठी ते दूध नाही तर मग दुसरं काय खाऊ, पिऊ शकतात?

टोफू माहितेय का? टोफू सोयाबीन पासून बनवतात. पनीर हे दुधापासून बनवलं जातं. Lactose Intolerant लोकं पनीर सुद्धा खाऊ शकत नाहीत. टोफू सोयाबीन पासून बनवलं जातं. कॅल्शियमसाठी हा उत्तम पदार्थ आहे. टोफू खा आणि कॅल्शियम मिळवा.

तुम्हाला सार्डिन मासा (Sardine Fish) माहितेय का हा मासा कॅल्शियम, ओमेगा- 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन डी चे चांगले स्रोत आहे. जर Lactose Intolerant असणाऱ्यांनी रोज मध्यम आकाराचा सार्डिन मासा खाल्ला तर दैनंदिन गरजेच्या 35 टक्के कॅल्शियम मिळेल.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की संत्र्यामध्ये फक्त व्हिटॅमिन सी नसतं. संत्री मध्ये कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणात आढळते. Lactose Intolerant असणारी लोकं दूध पिऊ शकत नाहीत पण संत्री किंवा संत्र्याचा रस पिऊ शकतात. रोज संत्र्याचा ज्यूस प्यायला की कॅल्शियमची समस्या दूर होऊ शकते.

बदाम भिजवून खा असं सांगितलं जातं. बदामात फक्त हेल्दी फॅट्स नाही तर कॅल्शियम सुद्दा असते. चांगल्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने Lactose Intolerant असणारी लोकं रात्री बदाम भिजवत ठेऊन ते सकाळी खाऊ शकतात. हा कॅल्शियम मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे.