मेडिकल बंद, पण डॉक्टर खरंच संप करु शकतात का? कायदा काय सांगतो?

देशभरात मेडिकल दुकानदारांचा संप सुरू असताना, भारतात डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी संप करू शकतात का? 'एस्मा' कायदा आणि रुग्णांच्या हक्कांबद्दल काय सांगतो नियम, जाणून घ्या सविस्तर.

| Updated on: May 20, 2026 | 3:52 PM
1 / 6
सध्या देशभरातील  मेडिकल दुकानांनी एकदिवसीय संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्रीचे (E-Pharmacies) वाढते जाळे, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अव्यावसायिक सवलती आणि बनावट औषध विक्रीमुळे धोक्यात आलेला किरकोळ औषध व्यवसाय वाचवण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या हाकेला प्रतिसाद देत राज्यातील लाखो मेडिकल दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

2 / 6

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे. मात्र भारतात डॉक्टर, नर्सेस किंवा रुग्णालयातील इतर कर्मचारी संप करू शकतात का? आणि यावर कायदा काय सांगतो, ते अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया.

3 / 6

भारतात संप करणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार मानला जात नाही. त्यातही वैद्यकीय सेवा ही लोकांच्या जीवनाशी जोडलेली अत्यावश्यक सेवा आहे. त्यामुळे, डॉक्टर कोणत्याही परिस्थितीत रुग्णालयाचे काम पूर्णपणे बंद पाडून संप करू शकत नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

4 / 6

रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून सरकार रुग्णालयांमध्ये एस्मा (अत्यावश्यक सेवा कायदा) लागू करू शकते. एकदा का हा कायदा लागू झाला, की डॉक्टरांना संप करता येत नाही. तरीही संप सुरू ठेवल्यास, संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकणे किंवा अटक करणे यासारखी कडक कारवाई होऊ शकते.

5 / 6

काही वेळा सुरक्षेचा मुद्दा, पगार किंवा डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ संप केले जातात. अशा वेळी ओपीडी (OPD) दवाखान्यातील बाह्यरुग्ण विभाग (जिथे नेहमीप्रमाणे तपासणी होते) सहसा बंद ठेवला जातो. पण इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन सेवा, अपघात विभाग आणि अतिदक्षता विभाग (ICU) मात्र नेहमी प्रमाणे सुरू ठेवले जातात, जेणेकरून गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत.

6 / 6

संपाच्या काळात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला किंवा त्याचा आजार बळावला, तर त्याचे कुटुंब डॉक्टर किंवा रुग्णालयाविरोधात वैद्यकीय निष्काळजीपणाचा (Medical Negligence) खटला दाखल करू शकते.

Follow Us