Rakshabandhan 2026 : जेनिलिया, कंगनापासून ते प्रीति झिंटापर्यंत.. बॉलिवूडचं खास रक्षाबंधन सेलिब्रेशन !

आज रक्षाबंधन हा सण देशभरात उत्साहात साजरा झाला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या कुटुंबीयांसोबत हा प्रेमळ सण मोठ्या आनंदात साजरा केला. कंगना रनौत, जेनेलिया देशमुख, रिद्धिमा कपूर आणि प्रीती झिंटा यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांनी त्यांचे रक्षाबंधन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले.

| Updated on: Aug 28, 2026 | 8:50 PM
1 / 5
आज रक्षाबंधन.. भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा हा सण देशभरात उत्साहाने आणि प्रेमाने साजरा केला जातो. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला. राखी बांधल्यानंतर आणि बांधून घेतल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आपले फोटो आणि भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या. तसेच चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या. (All Photos : Social Media)

2 / 5

बॉलिवूडची डिंपल गर्ल, अभिनेत्री प्रीती झिंटाने आपल्या भावांसोबत रक्षाबंधन साजरं केलं. तिच्या फोटोंवरही लाईक्सचा वर्षाव झाला.

3 / 5

अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरने काहीशा वेगळ्या अंदाजात रक्षाबंधन साजरं केलं. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रणबीर कपूरसोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केला.

4 / 5

बबली गर्ल, अभिनेत्री जेनेलियाने ही एक व्हिडीओ शेअर केला, त्यामध्ये ती तिच्या लाडक्या भावाला राखी बांधताना दिसली. "दरवर्षी होणारी आपली भांडणं! नेहमी मोठ्या बहिणीलाच भेटवस्तू द्याव्या लागतात आणि लाड करावे लागतात, उलटं होऊच शकत नाही. पण यावेळी निगु पिगुने छोट्या गँगची मदत घेतली आणि माझा पद्धतीने पराभव झाला. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा निगु पिगु! मी नेहमी तुझ्यासोबत असेन" असं लिहीत तिने शुभेच्छा दिल्या.

5 / 5

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले. तिच्या फोटोंवर बरेच लाइक्स आणि कमेंट्स आल्या होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us