
आचार्य चाणक्य हे मोठे अर्थशास्त्री होते. त्यांना राजकारणातील ज्ञानदेखील होते. त्यांनी दिलेले संदेश आजदेखील तेवढेच लागू होतात. म्हणूनच त्यांच्या विचारांचे पालन केल्यास यशस्वी आयुष्य जगता येते असे म्हटले जाते. त्यांनी सांगितलेले विचार हे आज चाणक्य नीती म्हणून प्रसिद्ध आहेत.

त्यांनी आयुष्यात कधीच काही गोष्टींचा संकोच करू नये असे सांगितलेले आहे. यामध्ये सर्वप्रथम त्यांनी पैसे कमवण्यात तसेच ते खर्च करण्यात कोणताही संकोच करू नका, असे आचार्य चाणक्य सांगतात. कारण संकोच केला तर संधी हातातून निसटून जाते, असे आचार्य चाणक्य यांचे मत आहे.

तसं पाहायचं झालं तर घरात शिवलिंगाची स्थापना करू नये, असे म्हटले जाते. तरीदेखील तुम्ही घरात शिवलिंग ठेवत असाल तर त्याचा आकार अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. घरात शिवलिंगाची स्थापना करताना देवी पार्वती, कार्तिकेय स्वामी, नंदीचीही छोटी प्रतिमा सोबत ठेवावी. शिवाच्या परिवाराची सोबत पूजा केल्यावर लवकर फळ मिळते, असे म्हटले जाते.

वास्तूशास्त्रानुसार शिवलिंग उत्त-पूर्व दिशेला ठेवावे. हा नियम पाळल्यास घरात शांतता नांदते, असे म्हटले जाते. घरात फक्त एकच शिवलिंग असावे. घरात एकापेक्षा अधिक शिवलिंग असतील तर उर्जेचे संतुलन बिघडते. मानसिक अशांतीचे हे कारण बनू शकते. घरात सोने, तांबे, चांदीचे शिवलिंग असेल तर खूप चांगली बाब असते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.