
आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वाचे संदेश दिलेले आहेत. त्यांनी दिलेल्या संदेसानुसार तुम्ही ज्या लोकांसोबत राहता, त्याच लोकांसारके तुम्ही बनता. तुमचा विकासही त्याच लोकांच्या संस्कारानुसार होतो. त्यामुळे नेहमी चांगल्या आणि आपल्यापेक्षा उत्कृष्ट लोकांशी मैत्री करायला हवी.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार नेहमी तुमच्या विषयी वाईट बोलणारी तसेच कोणतीही स्थिती असली तरीही दुमचे दोष सांगून तुम्हाला अडचणीत आणणाऱ्या व्यक्तीसोबत राहू नये. अशा लोकांपासून दूर राहणेच कधीही चांगले. या लोकांमुळे तुमची सकारात्मक उर्जा कमी होते.

काही लोक नेहमी खोटं बोलतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. खोटं बोलणाऱ्या लोकांशी कधीच मैत्री करू नये. खोटं बोलून हेतू साध्य करणाऱ्या लोकांशी तुम्ही मैत्री केली तर तुम्हीदेखील कधीतरी संकटात सापडू शकता.

काही लोक खूपच आळशी असतात. आळशी व्यक्ती तुमचा मित्र असेल तर तुम्हीदेखील आळशी होता. म्हणूनच अशा लोकांपासून नेहमी दूर राहा. अशा लोकांशी मैत्री केली तर आयुष्यात तुमची कधीच प्रगती होणार नाही, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.