Chanakya Niti | ज्ञान, गुण, आयुष्याला घेऊन आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टी कधीही विसरु नका, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल

| Updated on: Nov 07, 2021 | 9:03 AM

आचार्य चाणक्य हे विद्वान आणि अनेक विषयांचे अभ्यासक होते. त्यांनी दिलेली शिकवण आजच्या आयुष्यात देखील लागू होते. आचार्यांच्या शिकवणीतील गोष्टी सामान्य माणसांनी आत्मसात केल्या तर सामान्य माणूसही आपले आयुष्य सन्मानाने आणि उत्तम प्रकारे जगू शकतो.

1 / 5
माणसाचे आयुर्मान किती असेल, माणूस कुठे जन्माला येईल, तो आयुष्यात काय करेल या गोष्टीवर आपण कोणीच नियंत्रण ठेवू शकत नाही. या गोष्टी बदलणं निव्वळ अशक्य आहे. पण समोर आलेल्या परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाणे ही गोष्ट मात्र आपल्या हातात असते. परिस्थिती योग्य प्रकारे हाताळल्यास आपण उत्तम प्रकारे आपले आयुष्य जगू शकतो.

2 / 5
ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी आपण जितकी वाटू तितकी वाढते. परंतु जे ज्ञान केवळ पुस्तकांपुरते मर्यादित आहे आणि त्याचा व्यावहारिकतेशी काहीही संबंध नाही, ते ज्ञान निरुपयोगी आहे. असे ज्ञान कोणाच्याही कामी येत नाही. खरे तर पुस्तक वाचून ज्ञान घेतले पाहिजे, पण ते ज्ञान व्यवहारातही आणले पाहिजे, तरच ते ज्ञान सार्थ ठरते.

3 / 5
प्रतिभा आणि ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी सराव करत राहिले पाहिजे. सरावानेच तुम्हाला प्राविण्य मिळते. पण जर तुम्ही सराव थांबवलात तर हळूहळू तुम्ही सर्व काही विसरायला लागाल आणि तुमचे अनेक वर्षांचे शिक्षण वाया जाईल.

4 / 5
 माणूस कितीही सुंदर असला, तरी त्याला ज्ञान प्राप्त झाले नाही, तर त्याची अवस्था गंध नसलेल्या फुलासारखी होते, जे फुल सुंदर असूनही सुगंधहीन असते.

5 / 5
कोकिळा जरी काळी असली तरी तिच्या आवाजामुळे ती सर्वांना प्रिय असते, त्याचप्रमाणे माणसाचे खरे सौंदर्य त्याच्या गुणांमध्ये, शहाणपणात, क्षमाशीलतेमध्ये या गोष्टी असलेला मनुष्य सर्वांना प्रिय असतो.