राग आणि अहंकाराचा त्याग (Anger and Ego) : आचार्य चाणक्यांच्या मते राग आणि अहंकार हे दोन्ही व्यक्तीचे शत्रू आहेत. क्रोध माणसाची विवेकबुद्धी हिरावून घेतो आणि अहंकारात माणसाला योग्य आणि अयोग्य या दोन्ही गोष्टीतला फरक कळत नाही. या दोन्ही गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातील अनेक संधी तुमच्या हातातून जावू शकतात. त्यामुळे या नवीन वर्षात संकल्प म्हणून दोन्ही गोष्टींचा त्याग करा.

चूक पुन्हा करू नका ( Do mistakes): चूक तो माणूस, असे म्हणतात, ते अगदी बरोबर आहे. चूक करण्यामुळे माणसाला अनुभव येतो. पण एक चूक पुन्हा करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे तुमच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करा.

परिश्रमाला घाबरू नका (Diligence) : परिश्रमाशिवाय कोणालाही यश मिळत नाही. त्यामुळे कष्टाला कधीही घाबरू नका. तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे, त्यासाठी इतके कष्ट करा की यश तुमचेच असेल.