Chanakya Niti : चाणक्य म्हणतात आयुष्यात या 5 लोकांपासून लांब राहा, नाहीतर फक्त..

Chanakya Niti : चाणक्य निती आयुष्यात प्रगती करण्यासाठी, टिकून राहण्यासाठी खूप महत्वाची आहे. आचार्य चाणक्य यांनी आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. चाणक्य निती काही लोकांपासून लांब राहण्याचा सुद्धा सल्ला देते.

| Updated on: Feb 22, 2026 | 3:35 PM
1 / 5
चाणक्य यांच्यानुसार काही लोक प्रत्येकवेळी तक्रारच करतात. प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधतात. त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे तुमचा मूड खराब होतो. सकारात्मक विचार संपतो. अशा लोकांपासून लांब राहणचं फायद्याचं आहे.

चाणक्य यांच्यानुसार काही लोक प्रत्येकवेळी तक्रारच करतात. प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधतात. त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे तुमचा मूड खराब होतो. सकारात्मक विचार संपतो. अशा लोकांपासून लांब राहणचं फायद्याचं आहे.

2 / 5

चाणक्य म्हणतात कुठल्याही नात्याचा पाया विश्वास असतो. पण काही लोक विनाकारण खोटं बोलत असतात. वेळ प्रसंगी ते तुमच्याविरोधात काम करु शकतात. अशा लोकांवर जास्त विश्वास ठेवणं नुकसानदायक ठरु शकतं.

3 / 5

कोण कितीही टॅलेंटेड असो. पण जर त्याच्यात मेहनत करण्याची सवय नसेल, तर तो तुम्हाला मागे खेचू शकतो. आळशी लोकांसोबत काम केल्याने किंवा मैत्री केल्याने तुमचा वेळ आणि एनर्जी दोन्ही वाया जाते.

4 / 5

काही लोक छोट्या-छोट्या गोष्टीवर रागवतात. ते आसपासचं वातावरण बिघडवतात. त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने तुम्ही सुद्धा तणावाखाली येता. अशा लोकांपासून दूर राहणं केव्हाही चांगलं.

5 / 5

काही लोक मैत्री फक्त दाखवण्यासाठी करतात. पण वेळ आल्यानंतर स्वत:च्या फायद्याचा विचार करतात. त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यात तुमचं नुकसान होऊ शकतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us