Chanakya Niti: तुमचा पैसा आणि वेळ वाया घालवतात हे 5 लोक, त्यांच्यापासून दूर रहा !

आचार्य चाणक्य सर्वात बुद्धीमान आणि चतुर व्यक्ती होते. ते एक महान राजकीय मुत्सदी आणि मानवी स्वभावाचे अभ्यासक होते. त्यांची चाणक्य निती आजच्या काळातही लागू पडते. त्यांनी काही लोकांपासून दूर राहाण्याचा सल्ला दिलेला आहे. कोण आहेत असे 5 लोक ते पाहूयात....

| Updated on: Dec 04, 2025 | 10:53 PM
1 / 5
 नकारात्मक लोक - आचार्य चाणक्य यांच्या मते नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना दूर ठेवावे. या लोकांना प्रत्येक बाबी वाईटच दिसत असते. या लोकांना छोट्या - छोट्या बाबींची तक्रार करतात.चाणक्यांच्या मते असे लोक तुमचा वेळ वाया घालवतात. काही काळानंतर तुम्ही यांच्या  निगेटिव्हीचे शिकार होता. त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवल्याने तुम्हाला थकायला होते.

2 / 5
खोटे बोलणारे लोक - चाणक्यांच्या मते खोटे बोलणारे लोक भरवशाचे नसतात. हे लोक तुम्हाला नेहमी चुकीची माहिती देत असतात. त्यांच्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान झेलावे लागते. चाणक्य म्हणतात अशा लोकांसोबत बिझनस करणे किंवा गुंतवणूक करणे खूपच जास्त नुकसानकारक असते.

3 / 5
आळशी लोक - चाणक्यांच्या मते आळशी लोक नेहमीच दुसऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाया घालवतात. अशा प्रकारचे लोक तुम्हाला मदत तर करत नाहीत, उलट तुमचा वेळ आणि एनर्जी वाया घालवतात. जर तुम्ही अशा लोकांवर विश्वास ठेवला किंवा काम केले तर तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो.

4 / 5
 भांडखोर लोक - चाणक्यांच्या मते तु्म्ही भांडखोर लोकांसोबत कधीही मैत्री करु नये. असे लोक कोणत्याही शुल्लक कारणासाठी भांडणे काढतात. या लोकांसोबत राहिल्याने तुमचा बहुतांशी वेळ आणि ऊर्जा त्यांचे भांडण सोडवण्यात जाते. अशा लोकांसोबत राहण्याने तणाव वाढतो. आणि पैसाही वाया जातो.

5 / 5
मैत्रीचे नाटक करणारे - आचार्य चाणक्य म्हणतात काही वेळा काही जण मैत्रीचा दिखावा करतात आणि तुमचे मित्र बनतात. असे लोक त्यांचा फायदा असेपर्यंत तुमच्यासोबत असतात नंतर ते तुम्हाला विसरुन जातात. चाणक्यांच्या मते अशा लोकांवर कधीही विसंबून राहू नये. कारण हे लोक धोकादायक असतात.