AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market Crash: ट्रम्प यांच्या एका घोषणनेने जगाला हादरवले! भारतापासून युरोपपर्यंतचे शेअर मार्केट धडाम, कोटींचे नुकसान

आज सलग पाचव्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली. अमेरिकेने भारत आणि इतर 16 देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के आयात शुल्क लावले आहे याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारात जाणवत आहे.

Share Market Crash: ट्रम्प यांच्या एका घोषणनेने जगाला हादरवले! भारतापासून युरोपपर्यंतचे शेअर मार्केट धडाम, कोटींचे नुकसान
| Updated on: Jul 24, 2026 | 11:05 AM
Share

अमेरिकेने भारत आणि इतर  16 देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10% आयात शुल्क लावले आहे. सक्तीच्या मजुरीचा वापर करून तयार केलेल्या वस्तूंची आयात रोखण्यात हे देश अपयशी ठरले आहेत, असा अमेरिकेचा दावा आहे. याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारातही जाणवत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 850 हून अधिक अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी  50 निर्देशांकही  23,700 च्या खाली गेला. सकाळी 10:15 वाजता, सेन्सेक्स 876.06 अंकांनी, म्हणजेच 1.15 टक्क्यांनी घसरून 75,515.33 वर आला. निफ्टीदेखील 258.80 अंकांनी, म्हणजेच 1.08 टक्क्यांनी घसरून 23,610.80  वर व्यवहार करत होता. या घसरणीमुळे बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 3 लाख कोटी रुपयांनी घसरून 473 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण झाली आहे. दरम्यान, रुपया आज डॉलरच्या तुलनेत 0.06% घसरणीसह 96.63 अंकांवर उघडला. मागील सत्रात तो  96.5725 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 29 शेअर्स घसरणीसह उघडले. इन्फोसिसला सर्वाधिक फटका बसला. भारती एअरटेल, इटरनल, इंडिगो, टाटा स्टील, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, एशियन बँक, मारुती, लार्सन अँड टुब्रो, ट्रेंट आणि अदानी पोर्ट्स यांच्या शेअर्समध्येही लक्षणीय घसरण दिसून आली. दुसरीकडे, केवळ एचसीएल टेकचा शेअर वाढीसह उघडला. निफ्टीमध्ये इटरनल, श्रीराम फायनान्स आणि बजाज फायनान्स यांना सर्वाधिक फटका बसला. व्यापक बाजारात, निफ्टी मिडकॅप आणि निफ्टी स्मॉलकॅप अनुक्रमे 0.63 टक्के आणि 0.62 टक्क्यांनी घसरले होते. क्षेत्रीय स्तरावर, निफ्टी रिअल्टी, निफ्टी ऑटो आणि निफ्टी मेटलमध्ये सर्वाधिक घसरण झाली, तर निफ्टी फार्मा आणि निफ्टी आयटीने चांगली कामगिरी केली.

अमेरिकेने भारत आणि इतर 16 देशांकडून खरेदी केलेल्या वस्तूंवर 10% शुल्क जाहीर केले आहे. अमेरिकेने आपल्या व्यापार कायद्याच्या कलम 301 अंतर्गत केलेल्या तपासानंतर हे पाऊल उचलले आहे, ज्यामध्ये 12.5 % शुल्क लावण्याचा प्रस्ताव होता. भारताव्यतिरिक्त, पाकिस्तान, बांगलादेश, कंबोडिया, श्रीलंका आणि यूकेवरही 10% शुल्क लादण्यात आले आहे. दरम्यान, ब्रेंट क्रूडच्या किमती मे महिन्यानंतर प्रथमच 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. इराण-समर्थित समुद्रात सौदीच्या दोन तेलवाहू जहाजांना लक्ष्य केले आहे, ज्यामुळे पश्चिम आशियामध्ये तणाव वाढला आहे. आज कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली असली तरी, या आठवड्यात त्यात 13% वाढ झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 10 टक्के शुल्काच्या बातमीचा जगभरातील शेअर बाजारांवर थेट परिणाम झाला आहे. शुक्रवारी आशियाई शेअर बाजारांमध्ये व्यवहार सुरू होताच, अनेक देशांमधील निर्देशांक कोसळले. जपानचा निक्केई निर्देशांक 2000 हून अधिक अंकांनी घसरून 64,334 वर बंद झाला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक जवळपास 6 टक्क्यांनी घसरून 6,665 वर बंद झाला.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार