AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे झाले काय?’ सोनम वांगचुक यांनी सांगितली उपोषण सोडतानाची Inside Story, सरकारचा प्लॅन काय?

Dharmendra Pradhan Resignation: सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर उपोषण सोडले, सरकारने अर्धी लढाई इथेच जिंकल्याचे मानले जात आहे. पण केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे घोडे अडले कुठे? असा सवाल विचारल्या जात आहे. त्यावर सोनम वांगचुक यांनी इनसाईड स्टोरी सांगितली.

'तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे झाले काय?' सोनम वांगचुक यांनी सांगितली उपोषण सोडतानाची Inside Story, सरकारचा प्लॅन काय?
धर्मेंद्र प्रधान, सोनम वांगचुक, जेपी नड्डा
| Updated on: Jul 24, 2026 | 10:59 AM
Share

Sonam Wangchuk Hunger Strike: अखेर सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर आमरण उपोषण सोडले. सरकारने अर्धी लढाई जिंकली आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीसोबत (CJP Protest) सरकार चर्चेची पहिली फेरी करण्याची शक्यता आहे. आंदोलनाची धग देशभरात पोहचली आहे. प्रत्येक शहरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सरकार आंदोलनाची हवा काढू पाहत असताना विरोधकांनी मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी रेटली आहे. वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडले. त्यावेळी CJP चा एकही सदस्य तिथे उपस्थित नव्हता. सरकारचे मोठे धोरण यावरून लक्षात येते. तर प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी वांगचुक यांनी मोठी अपडेट दिली आहे.

कोणत्या मुद्यावर सोडले उपोषण?

दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांवर कोणतेही गुन्हे दाखल न करणे

20 जुलैच्या मोर्चात सहभागी झालेल्यांवर कारवाई न करणे

NEET पेपरफुटीप्रकरणात संसदेत चर्चा करणार

शिक्षण व्यवस्थेत सुधारणेसाठी सरकार प्रयत्न करणार

या मुद्यांवर एकमत झाले आणि मध्यरात्री सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले. पण या संपूर्ण चर्चेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची साधी एक ओळही नव्हती. NEET पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचा सरकारचा विचार आहे. मोदी सरकारची ही मोठी खेळी मानली जाते.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा?

उपोषण सोडताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकारने अवाक्षरही काढले नाही हे विशेष. त्यामुळे सरकार आंदोलनातील हवा काढून हा मुद्दा तडीस नेण्याचा प्रयत्नात असल्याचा संघटनांचा आरोप आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याविषयी सरकारकडून कोणतेही तातडीचे आश्वासन देण्यात आले नाही. या विषयावर संसदेत चर्चा होईल, मात्र राजीनामा कधी होईल याविषयी सरकारने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नसल्याचे वांगचुक यांनी स्पष्ट केले.

आपल्यापुढे यावेळी दोन पर्याय होते. उपोषण आणखी काही आठवडे सुरू ठेवणे अथवा आंदोलन पुढे नेण्यासाठी स्वतःचे आरोग्य जपणे असे ते दोन पर्याय होते. अनेक समर्थकांनी त्यांना जिवंत राहून लढा सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. अखेर हा सल्ला मानत उपोषण सोडल्याचे वांगचुक म्हणाले.

वांगचुक यांचा सरकारला गर्भित इशारा

अभिजीत दिपके यांच्या पुढाकाराने सध्या दिल्लीतील जंतर मंतर येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकही एकवटले आहेत. इतक्यांदा पेपरफुटी झाली त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे विरोधकांसह आंदोलकांचे म्हणणे आहे. या सर्व घडामोडींवर वांगचुक यांनी सरकारला गर्भित इशारा दिला आहे. जर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. तर त्यात विद्यार्थ्यांचे नुकसान नव्हे सरकारचे नुकसान होईल. सरकारने वेळीच निर्णय घेऊन हा वाद शक्य तितक्या लवकर संपवावा असा सल्ला द्यायलाही वांगचुक विसरले नाहीत.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?