AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: वांगचुक यांचे उपोषण सुटले, पण… संजय राऊतांचा सरकारला खणखणीत इशारा, मोदी सरकारसमोरील नवीन आव्हान काय?

Sanjay Raut on Sonam Wangchuk: पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडले. त्यावरून आता राजकारण तापले आहे. खासदार संजय राऊत यांनी उपोषण सोडल्याचा आनंद व्यक्त करत, सरकारला सज्जड इशारा दिला आहे. मोदी सरकारसमोर नवीन आव्हान काय?

Sanjay Raut: वांगचुक यांचे उपोषण सुटले, पण... संजय राऊतांचा सरकारला खणखणीत इशारा, मोदी सरकारसमोरील नवीन आव्हान काय?
सोनम वांगचुक, संजय राऊत
| Updated on: Jul 24, 2026 | 10:36 AM
Share

Sanjay Raut on Sonam Wangchuk: पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर मध्यरात्री उपोषण सोडले. उपोषण सोडताना कॉक्रोच जनता पार्टीचा (CJP) एकही सदस्य तिथे उपस्थित नव्हता. यावरून आता राजकारण तापले आहे. खासदार संजय राऊत यांनी उपोषण सोडल्याचा आनंद व्यक्त करत, सरकारला खणखणीत इशारा दिला आहे. मोदी सरकारपुढे आता कोणते नवीन आव्हान ठाकले आहे? काय म्हणाले राऊत?

उपोषण सोडले आनंद, पण…

सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर येथून सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले असते तर देश अधिक आनंदीत झाला असता, हे माझं मत आहे. ज्या सरकारविरोधात आपण उपोषण केलं. त्याचे दोन मंत्री येतात आणि आपलं उपोषण सोडतात. आंदोलक म्हणून माझी अशी भूमिका आहे की, हे आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी आणि हुकुमशाहीविरोधातील सर्व पक्ष, संघटना एकत्र आल्या. त्यांच्या पैकी तिथे एखादा प्रतिनिधी तिथे हवा होता. किमान अभिजीत दिपके, विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे तिथे उपस्थित असायला हवे होते. सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या याविषयी अजूनही संभ्रम आहे. जी मुळ मागणी होती, ती मुळ मागणी ही निष्क्रिय आणि भ्रष्ट मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती. त्याशिवाय उपोषण संपणार नाही, असा मुद्दा होता. जिद्द होती. त्या मागणीचे काय झाले हे देशाला सांगावे लागेल. प्रधान यांना का वाचवले जात आहे, हे देशाला सांगावं लागेल. मग सोनम वांगचुक यांचं 26 दिवसाचे उपोषण काय कामाचे आणि त्याच मागणीसाठी लाखो लोक देशभरात रस्त्यावर उतरले जंतर-मंतर पर्यंत पोहोचले एक मुलगी शहीद झाली. एका मुलीचा मृत्यू झाल. काल हिंसाचारात अमित शहांच्या पोलिसांनी त्यांच्या आदेशाने अत्याचार केले. डोके फोडले या सगळ्याचा विचार आता सोनम वांगचुक यांना करावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले.

आता आंदोलन थांबणार नाही

सोनम वांगचुक यांच्या निमित्ताने देशातील शिक्षण पद्धती बदलण्यासाठी देशातल्या हुकुमशाहीची टक्कर घेणार एक आंदोलन उभं राहिलं ते आंदोलन आता थांबणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. आज आणि इतर सगळ्या संघटना संस्था मिळून देशभरात आंदोलन करत आहेत. आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या वतीने मुंबईत राष्ट्रगान आंदोलन होत आहे. 26 जुलै रोजी, रविवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईत विराट मोर्चा आयोजित केला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात आंदोलन होत आहे, असे राऊत म्हणाले.

सोनम वांगचुक यांचे उपोषण मध्यरात्री सोडवले. त्यावेळी आंदोलनातील एक माणूस उपस्थित नव्हता. विरोधी पक्षाला यावेळी सरकारने विश्वासात घेतले नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही चर्चेला घाबरतो, आम्ही चर्चेला घाबरतो? चर्चा तुम्हाला आम्ही इतर वेळी जेव्हा चर्चा मागितल्या पुलवामापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात तुम्ही चर्चा कधी दिल्या. लोकसभेत या विषयावर सुद्धा आम्ही पहिला दिवशी चर्चा मागत होतो. तुम्ही त्यातून पळ काढला. आता आंदोलन हाता बाहेर जात असल्याची भीती वाटली. तेव्हा आंदोलन संपवण्यासाठी ते बदनाम करण्यात आले. सोनम वांगचुक यांना तुम्ही चीनचे एजंट म्हणत होतात. त्यांना उपोषण स्थळापासून तुम्ही फरपटत नेलं. उपोषण मागे घेतल्यानंतर तुम्ही समाधान आनंद व्यक्त केला पण या व्यवस्थेत विरुद्ध किंवा ज्या सरकारी तर एका अत्यंत जखमी झालेल्या त्या मुलीकडून त्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी ते उपोषण सोडायला पाहिजे सरकार येऊ शकत नाही हा निर्णय लाखो आंदोलकांपैकी कोणीतरी एकाने घ्यायला पाहिजे होता. सरकारला उपोषण सोडवून घेण्याचे श्रेय घ्यायचं होतं अमित शहा भयभीत होते. नरेंद्र मोदी भयभीत आहेत. एरवी नरेंद्र मोदी यांना देशाला संबोधित करण्याचे वेळ आठ वाजता असते काल रात्री बारा वाजता मोदी समाज माध्यमावर आले, असा आसूडही राऊतांनी ओढला.

Follow Us
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?