AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खिचडी खाल्यानंतर कुटुंबावर संकट, मुलावर काळाचा घाला, तर तिघांची मृत्यूशी झुंज, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलं काय?

Food Poising : छत्रपती संभाजीनगरमध्ये खिचडी खाल्यानंतर एका कुटुंबावर संकट कोसळले. या कुटुंबातील लहान मुलाचा मृत्यू झाला तर कुटुंबातील इतरांची जगण्यासाठी झुंज सुरू आहे. या घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे.

खिचडी खाल्यानंतर कुटुंबावर संकट, मुलावर काळाचा घाला, तर तिघांची मृत्यूशी झुंज, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलं काय?
खिचडी खाल्यानंतर कुटुंबावर संकट
| Updated on: Sep 11, 2026 | 9:58 AM
Share

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे अन्नविषबाधेची घटना घडली आहे. घरात रात्री खिचडी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चारही सदस्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास झाला. यामध्ये उपचारादरम्यान सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, त्याच्या बहिणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयुष नारायण थोटे असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने चिंचोली लिंबाजी या गावावर शोककळा पसरली आहे.

खिचडीतून विषबाधा?

घरात रात्री खिचडी खाल्यानंतर नारायण थोटे, त्यांची पत्नी देवशाला, मुलगी गायत्री आणि मुलगा आयुष यांना पहाटेपासून त्रास सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी स्थानिक पातळीवर उपचार घेतले. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांना गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सिल्लोड येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, सिल्लोडला नेत असताना गुरूवारी आयुषचा मृत्यू झाला. सात वर्षीय गायत्रीवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे चिंचोली लिंबाजी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात असुविधांचा बाजार

दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात असुविधांमुळे विद्यार्थिनी हैराण झाल्या आहेत. द्वारकानगरातील भाड्याच्या जागेत चालणारे हे वसतिगृह नरकयातना गृह ठरले आहे. वसतिगृहितील भोजनाचा दरवाजा निकृष्ट असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. जेवणात अळ्या, तार आणि गोगलगाय आढळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा प्रकार दोन महिन्यांपासून सुरू आहे. तक्रार करूनही मोठा बदल झाला नाही. तक्रारीनंतर आठ मेसचालक बदलले, पण अन्नाचा दर्जा मात्र खालावलेलाच आहे. या वसतिगृहात 250 मुली राहतात. पण स्वच्छतेसाठी केवळ दोनच कर्मचारी आहेत. अनेक दिवस स्वच्छताच होत नसल्याचा आरोप विद्यार्थिंनीनी केला आहे. खोलीत साप मुंगूस तर रात्री मोकाट कुत्री घुसत असल्याचा आरोपही विद्यार्थिंनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. सामाजिक न्याय मंत्र्यांनी या घटनेकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Follow Us
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?