Chanakya Niti | चाणक्य नीतीनुसार ‘या’ 5 परिस्थितीत माणूस मनातून तुटून जातो…

| Updated on: Dec 18, 2021 | 8:30 AM

आचार्य चाणक्य हे विद्वान होते. त्यांनी त्याच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला. पण त्यांनी कधी हार मानली नाही. त्यांचे अनुभव त्यांनी चाणक्य नीतीमधून सर्वांना दिले. या नीतीशास्त्रात त्यांनी कोणत्या परिस्थितीत माणूस हतबल होतो या बद्द्ल माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत माणूस सारासार विचार करत नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 6
पत्नी किंवा खास व्यक्तीपासूनविभक्त होण्याची परिस्थिती एखाद्या व्यक्तीसाठी खूप दुःखदायक असते. ही परिस्थिती सहन करणे प्रत्येकासाठी सोपे नसते. अशा वेळी माणसाचे निर्णय चुकतात.

2 / 6
बाहेरील लोक आपल्याबद्द्ल काय बोलतात यावर व्यक्तीला जास्त वाईट वाटत नाही पण जर व्यक्तीला नातेवाईक, मित्रांकडून अपमानीत व्हावे लागते तेव्हा ही परिस्थिती खूप वेदनादायक असते.

3 / 6
कोणत्याही व्यक्तीवर जेव्हा अतिरिक्त कर्ज होते तेव्हा ती परिस्थिती त्या व्यक्तीसाठी खूप त्रासदायक असते.  कर्ज असल्यामुळे सततच्या विचारांमुळे माणसाला झोपही लागत नाही.

4 / 6
जर एखाद्या भल्या माणसावर जर कोणी चारित्र्यहीन असल्याचा आरोप लावला तर त्या व्यक्तीस गुदमरल्यासारखे होते. अशा परिस्थित माणसाने स्वत:वर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे असते.

5 / 6
गरिबी ही कोणत्याही माणसासाठी अत्यंत वेदनादायी परिस्थीती असते. पैशाअभावी माणसाला सर्व सुखाचा त्याग करावा लागतो. पैसा नसल्याने आपल्या जवळच्या व्यक्तीला आयुष्यातील सुख देऊ शकत नाही. त्यामुळे माणसे अधिक दु:खी होतात.

6 / 6
चांगल्या स्वभावाचा माणूस जर स्वार्थी व्यक्तीला भेटला तर परिस्थिती त्याच्यासाठी खूप दुःखी होते. जगात स्वार्थी माणसांपासून दूर राहणेच आपल्या हिताचे असते.