श्रीदेवीच्या 37 वर्ष जुन्या गाण्याचा पाकिस्तानमध्ये बनला रिमेक अन् या गाण्याची अशी वाट लावली की… कहाणी जाणून थक्क व्हाल

बॉलिवूडमध्ये काही गाणी अनेक दशाकांपर्यंत चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. असं एक गाणं आहे जे 37 वर्षांपूर्वी ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्याने भारतासह पाकिस्तानमध्येही लोकप्रियता मिळवली. या गाण्याच्या चालीवर पाकिस्तानमध्ये वेगळे गाणे तयार करण्यात आले. विशेष म्हणजे, पाकिस्तानी गायकाने ही चाल कॉपी केल्याचे स्वतः मान्य केले होते.

| Updated on: Oct 07, 2026 | 4:26 PM
1 / 5
1989 मध्ये यश चोप्रा दिग्दर्शित ‘चांदनी’ चित्रपट प्रदर्शित झाला. ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रित झालेले ‘चांदनी ओ मेरी चांदनी’ हे गाणे प्रचंड गाजले. आनंद बक्षी यांच्या शब्दांना शिव-हरि यांनी संगीत दिले होते.

1989 मध्ये यश चोप्रा दिग्दर्शित ‘चांदनी’ चित्रपट प्रदर्शित झाला. ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रित झालेले ‘चांदनी ओ मेरी चांदनी’ हे गाणे प्रचंड गाजले. आनंद बक्षी यांच्या शब्दांना शिव-हरि यांनी संगीत दिले होते.

2 / 5

या गाण्याचे चित्रीकरण स्वित्झर्लंडमधील सुंदर बर्फाच्छादित परिसरात करण्यात आले होते. श्रीदेवी आणि ऋषी कपूर यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. आजही हे गाणे रोमँटिक गाण्यांमध्ये आवर्जून ऐकले जाते.

3 / 5

1991 मध्ये पाकिस्तानमध्ये ‘नादिरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ‘नादिरा ओ मेरी नादिरा’ गाण्याची सुरुवात आणि मांडणी ‘चांदनी ओ मेरी चांदनी’सारखी असल्याचे दिसते.

4 / 5

पाकिस्तानी गायक ए. नय्यर यांनी ‘Dawn’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. “उन्हें हिंदी गाने 'चांदनी ओ मेरी चांदनी' की धुन पर गाना गाने को कहा गया था, जिसे बदलकर 'नादिरा ओ मेरी नादिरा किया गया था'.”

5 / 5

‘चांदनी’मधील हे गाणे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. श्रीदेवी-ऋषी कपूर यांची केमिस्ट्री आणि शिव-हरि यांचे संगीत त्याची खासियत ठरली. 37 वर्षांनंतरही या गाण्याची चर्चा भारत आणि पाकिस्तानमध्ये पाहायला मिळते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us