
ग्रहणकाळात पचनक्रिया कमकुवत होते. त्यामुळे या काळात खाल्ल्याने अपचन, गॅस, पोटदुखी आणि इतर पचनविषयक आजारांचा धोका वाढतो. या काळात तेलकट, पचण्यास जड आणि दुग्धजन्य पदार्थ खाणं सहसा टाळावेत, असं म्हटलं जातं. ग्रहणकाळात दूध, दही, चीज, मांसाहारी पदार्पण आणि शिजवलेल्या भाज्या खाऊ नयेत.

ग्रहणकाळात खाण्या-पिण्याच्या गोष्टी दूषित होतात, ज्यामुळे पोट आणि शरीरातील इतर भागात इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. स्वच्छतेची काळजी न घेतल्यास बॅक्टेरिया किंवा व्हायरसने संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो.

ग्रहणकाळात शरीर कमकुवत होतं. अशा वेळी अस्वच्छ अन्न खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. यामुळे शरीर आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते. ग्रहणकाळात आरोग्याला प्राधान्य द्यायला हवं, असं आयुर्वेद विशेषज्ञ डॉ. राजेश सिंह सांगतात.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजेश सिंह यांनी सांगितलं, चंद्रग्रहणादरम्यान लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती आणखी कमकुवत होते. अशा वेळी दूषित अन्न खाल्ल्याने लहान मुलांच्या पोटात जंत होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे आईवडिलांनी अशा वेळी विशेष काळजी घ्यायला हवी.

ग्रहणकाळात जेवणाचा शरीरावर अतिरिक्त परिणाम होतो. यामुळे अधिक झोप येते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे अधिक त्रासदायक ठरू शकतं. कारण त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ग्रहणकाळात जेवण पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.