
रायगडच्या पेणमधील नगरपालिका निवडणुकीच्या मतदानानंतर केईएस स्कुलमध्ये स्ट्ऱाँग रूम बनवून पोलीस बंदोबस्तात आणि निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत.

शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्ऱाँगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतपेट्या खाली असलेल्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्याने एकच गोंधळ उडाला . याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेण्यात आला.

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज फोटो वायरल झाल्याने उमेदवार आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडून चर्चेला उधाण आले होते. यासंदर्भात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

यानंतर तहसीलदार तानाजी शेजाळ आणि अधिकारी वर्गाने स्ट्ऱाँगरूम येथे येऊन सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली.

उंदरामुळे लाकडी कपाटाचा दरवाजा उघडला असल्याचे सांगण्यात आले होते. तपासणीअंती खरोखरच तसाच प्रकार आढळला. सीसीटीव्ही फुटेजमध्येही उंदराने दरवाजा उघडल्याचे दिसून आल्याचे निवडणूक अधिकारी तानाजी शेजाळ यांनी माहिती देताना सांगितले.