
विराट कोहली हा T20 वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी करताना दिसला. विराट टीमसोबत भारतात पोहचला होता. त्यानंतर तो अनुष्का शर्माला भेटण्यासाठी थेट लंडनला गेलाय.

विशेष म्हणजे अत्यंत खास असे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे घर मुंबईमध्ये आहे. या घराची एक खास झलक आज आपण पाहणार आहेत.

मुंबईच्या वरळी येथील ओमकार बिल्डिंगमध्ये विराट आणि अनुष्काचा फ्लॅट आहे. विशेष म्हणजे हा फ्लॅट अत्यंत आलिशान असा आहे.

ओमकार बिल्डिंगमध्ये 35 व्या मजल्यावर हा फ्लॅट असून 7000 स्क्वेअर फूटपेक्षा जास्त मोठा हा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये स्विमिंग पूल आणि जिमही आहे.

विराट कोहली हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. फक्त भारतातच नाहीतर विदेशातही विराटची संपत्ती आहे. विराट कोहली हा लंडनला शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे.