Todays Gold Rate: सर्वसामान्यांचा हिरमोड! सोन्याचे भाव पुन्हा वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव हे चांगलेच वाढताना दिसत आहेत. आजचा भाव तर सर्वसमान्यांचे स्वप्न भंग करणारा ठरत आहे.

| Updated on: Feb 18, 2026 | 2:23 PM
1 / 5
भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय मौल्यवान मानला जाणारा धातू सोने हे काही दिवसांनी फक्त श्रीमंतांना खरेदी करता येणार असल्याचे चित्र आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याचे वाढणारे भाव पाहून सर्वसमान्यांना ते न परवडणारे आहेत असे दिसत आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय मौल्यवान मानला जाणारा धातू सोने हे काही दिवसांनी फक्त श्रीमंतांना खरेदी करता येणार असल्याचे चित्र आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याचे वाढणारे भाव पाहून सर्वसमान्यांना ते न परवडणारे आहेत असे दिसत आहे.

2 / 5

गेल्या वर्षीपासून सोने आणि चांदीचे भाव हे सतत वाढत आहेत. अक्षरश: ते आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. आज तर सोने आणि चांदीचा भाव इतका वाढला आहे की अनेकांचे सोने स्वप्न खरेदीचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.

3 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आज चांगलीच वाढ झाल्याचे चित्र आहे. जवळपास एक हजार रुपयांनी ही वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या भावांनी अक्षरश: आकाशाला स्पर्श केला आहे.

4 / 5

आज, सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 57 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 49 हजार 260 रुपयांवर पोहोचले आहेत. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याने चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us