अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे पोहचताच पोलिसांनी रोखले, पाहा फोटो….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते. त्या स्मारकाचे काम सुरु झाले नसल्याने स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे संतप्त झाले आहे. ते स्मारकाची पाहणी करण्यासाठी गेट वे ऑफ इंडियावर पोहचले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले.

| Updated on: Oct 06, 2024 | 1:57 PM
1 / 5
छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या स्वराज पक्षाचे कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाला पोहचले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी पोलिसांनी स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकडही केली.

2 / 5
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. पण स्मारकाचे काम का सुरु झाले नाही? मला तुलना करायची नाही पण गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचे स्मारक आठ वर्षांत अजून झाले नाही, असे संभाजीराजे यांनी विचारले.

3 / 5
छत्रपती शिवाजी महाराजांचे नावाचे राजकारण खूप झाले. या प्रकरणात आता खोटे खपवून घेणार नाही, असे संभाजीराजे यांनी यावेळी बोलताना सांगितले. गेट वे ऑफ इंडियाजवळ एका कारवर उभे राहून त्यांनी भाषण केले.

4 / 5
मी कायदा मोडत असेल तर सांगा, मी या ठिकाणावरुन परत जातो, असे संभाजीराजे यांनी पोलिसांना बजावले. आम्ही कायदा हातात घेणार नाही, असे त्यांनी म्हटले.

5 / 5
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहणार होते. २०१६ मध्ये त्यांचे जलपूजन झाले. आता काम कुठपर्यंत आले, त्याची आम्हाला पाहणी करायची असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले.