AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरगुती गॅस सिलेंडरचे दर या महिन्यात कमी होणार? या पाच कारणांमुळे शक्यता वाढली

अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. त्यामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. असं असताना युद्ध थांबल्यानंतर पुन्हा एकदा होर्मुज सामुद्रधुनीतून गॅस आणि तेलाच्या जहाजांची वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे इंधानाच्या दरात घट झाल्याचं दिसत आहे.

घरगुती गॅस सिलेंडरचे दर या महिन्यात कमी होणार? या पाच कारणांमुळे शक्यता वाढली
घरगुती गॅस सिलेंडरचे दर या महिन्यात कमी होणार? या पाच कारणांमुळे शक्यता वाढलीImage Credit source: TV9 Network
| Updated on: Jul 01, 2026 | 6:17 PM
Share

अमेरिका इराण युद्ध थांबल्यानंतर होर्मुज सामुद्रधुनीतून मालवाहतूक जहाजांची वाहतूक सुरू झाली आहे. त्याचा परिणाम आता इंधनाच्या दरावर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले दर आता कमी होताना दिसत आहेत. तणावाच्या काळात जगभरातील व्यावसायिक एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती. त्याचा थेट परिणाम बजेटवर झाला होता. आता सर्व काही सुरळीत होत असताना सरकारी मालकीच्या तेल आणि वायू विपणन कंपन्यांनी 1 जुलै रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत प्रति लिटर 183.5 रुपयांनी आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलची (एटीएफ) किंमत प्रति लिटर 5 रुपयांनी कमी केली आहे. व्यावसायिक एलपीजी आणि एटीएफ दोन्ही अनियंत्रित इंधन आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानकांच्या आधारे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किमती सुधारल्या जातात.

अमेरिका इराण युद्ध स्थितीत भारतात अनियंत्रित इंधनाच्या किमती चार पटीने वाढल्या होत्या. या काळात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1373 रुपयांनी वाढली होती. मुंबईत 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 183.5 रुपाने कमी झाली असून मुंबईत आता 2884 रुपये झाली आहे. तर दिल्लीत 2930, कोलकात्यात 3072 आणि चेन्नईत 3099.5 रुपये झाली आहे. फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलेंडरच्या दरातही 13 रुपयांनी कपात केली आहे. पण 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत सुमारे 942 रुपये इतकीच आहे. त्यामुळे या महिन्यात घरगुती सिलेंडर दरात घट होण्याची शक्यता आहे.

घरगुती सिलेंडरच्या दरात कपात होण्याची पाच शक्यता

  1. अमेरिका इराण युद्ध थांबल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाली आहे. त्यामुळे गॅस आणि तेलवाहू जहाजांची वाट मोकळी झाली आहे. भारतही याच मार्गातून तेल आयात करतो. त्यामुळे पुरेसा साठा उपलब्ध होणार असून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती कमी होऊ शकतात.
  2. व्यावसायिक सिलेंडरच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कल आणि आयात खर्चावर अवलंबून असतात. व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती कमी झाल्याने दबाव कमी झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे भारतातील घरगुती गॅसच्या किमतीत घट होऊ शकते.
  3. भारताने अमेरिकेतून दरवर्षी 2.2 दशलक्ष टन एलपीजी आयात करण्याचा करार केला आहे. केप्लरच्या हवाल्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जून 2026 मध्ये अमेरिकेतून होणारी भारताची एलपीजी आयात 1 दशलक्ष टनांचा विक्रमी आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरवठा वाढला की किमतीवर कमी होतील.
  4. भारत कतारकडून मोठ्या प्रमाणात इंधन आयात करतो. इराण-अमेरिका युद्धाच्या काळातही, कतारने भारताला अखंड इंधन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. आता होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यामुळे, भारताचा आयात खर्च आणि पुरवठ्यातील जोखीम कमी होऊ शकते. याचा परिणाम देशांतर्गत एलपीजी सिलेंडरच्या किमतींवरही दिसून येऊ शकतो.
  5. इंडक्शन कुकर आणि एअर फ्रायर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक स्वयंपाक उपकरणांचा वापर वाढला आहे. लोकांचे एलपीजी गॅस सिलिंडरवरील अवलंबित्व कमी झाले आहे. यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट होऊ शकते.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा