AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईत तुफान पाऊस… उघड्या वायरींचं पाण्यात करंट, दोन मुलींना शॉक लागला; शहरात खळबळ

Navi Mumbai Rain : नवी मुंबईत पावसाचा कहर पहायला मिळत आहे. अशातच नेरूळ येथील LP ब्रिज शेजारी दोन विद्यार्थीनींना शॉक लागल्याची घटना समोर आली आहे.

नवी मुंबईत तुफान पाऊस... उघड्या वायरींचं पाण्यात करंट, दोन मुलींना शॉक लागला; शहरात खळबळ
Navi Mumbai Girls ShockImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 01, 2026 | 6:35 PM
Share

मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नवी मुंबईत पावसाचा कहर पहायला मिळत आहे. या पावसामुळे वेगवेगळे अपघातदेखील घडले आहेत. नेरूळ येथील LP ब्रिज शेजारी दोन विद्यार्थीनींना शॉक लागल्याची घटना समोर आली आहे. या मुली रस्त्याने जात असताना विजेची वायर खाली पडली होती, या वायरचा मुलींना स्पर्श झाल्याने त्या दोघींना शॉक लागला त्या बेशुद्ध पडल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेरूळमध्ये विद्यार्थीनींना लागला शॉक

LP ब्रिज शेजारी दोन विद्यार्थीनींना शॉक लागल्याने नेरूळमध्ये खळबळ उडाली आहे. या मुलींना बाजूला असलेल्या डी वाय पाटील या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र महानगरपालिकेने त्यांना सध्या वाशीतील फोर्टीज रुग्णालयात देखरेकीखाली ठेवले आहे. पहिल्याच पावसात ही खळबळजनक घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी बॅरिकेट लावून परिसर सील करण्यात आलेला आहे. महावितरणचे अधिकारी आणि पोलिस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.

काय म्हणाल्या महापौर?

या घटनेबाबत बोलताना नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी म्हटले की, ‘ही दुर्देवी घटना आहे, नक्की चूक कोणाची आहे याचा आम्ही तपास करत आहोत. महावितरण की इतर कोणी दोषी आहे याचा तपास सुरू आहे. या दोन मुलींना आम्ही फोर्टीज रुग्णालयात देखरेखीसाठी ठेवलं आहे. दरम्यान, या विद्यार्थीनींना प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर घरी सोडण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.’

नवी मुंबईत अनेक ठिकाणी साचले पाणी

नवी मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे, याबाबत बोलताना सुजाता पाटील यांनी म्हटले की, ज्या ठिकाणी पाणी साचलं तिकडे मी जात आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला मी काम योग्य पद्धतीने करायला सांगत आहे. नालेसफाई झाली आहे, मात्र आपण सर्वानी काळजी घेतली पाहिजे. सिडको देखील दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे पाणी साचलं आहे. आम्ही सिडकोच्या एमडींशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!