दुष्काळाचं विदारक चित्र, मुलांप्रमाणे वाढवलेली मोसंबी बाग जेसीबीनं काढून टाकली, शेतकरी हवालदिल

छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्याचा एव व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याने दीड एकरावरील मोसंबीच्या झाडांवर जेसीबी चालवला आहे. दुष्काळाची भीषणता दर्शवणारा हा व्हिडिओ शेतकऱ्याची व्यथाही सांगतो आहे.

| Updated on: Sep 29, 2026 | 6:26 PM
1 / 5
दुष्काळाच्या झळा शेतकरी किती सोसत आहेत. त्याच उदाहरण समोर आलं आहे. पाउस नसल्याने शेतकऱ्याने उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे. ही घटना छंत्रपती संभाजीनरमध्ये घडली आहे.

दुष्काळाच्या झळा शेतकरी किती सोसत आहेत. त्याच उदाहरण समोर आलं आहे. पाउस नसल्याने शेतकऱ्याने उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे. ही घटना छंत्रपती संभाजीनरमध्ये घडली आहे.

2 / 5

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर दिसून येतेय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथील शेतकरी संदीप वाघ यांच्यावर पाण्याअभावी आपल्या दीड एकर मोसंबीची बाग जेसीबीने काढून टाकण्याची वेळ आली.

3 / 5

वर्षानुवर्षे तळहाताच्या फोडाप्रमाणे आणि पोटच्या पोरासारखी जपलेली बाग पाण्याअभावी अक्षरशः जमीनदोस्त करण्यात आली. पिकाला जगवण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याने अखेर नाईलाजाने शेतकऱ्याने बागेवर जेसीबी फिरवला.

4 / 5

दुष्काळाने शेती आणि शेतकऱ्यांच्या जगण्यावर किती गंभीर परिणाम केला आहे, याचे हे विदारक चित्र आहे. पाण्याअभावी दीड एकर मोसंबीची बाग काढण्याची वेळ. शेतकऱ्याच्या डोळ्यांसमोर हिरवळ उद्ध्वस्त करण्यात आली.

5 / 5

पावसाअभावी राज्यामध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांच्या संमीश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्याचवेळी शेतकऱ्यांना आता अशाही काही निर्णयांना सामोरे जावे लागत आहे. ज्या पिकांना जीव लावून वाढवलं त्यांनाच उद्ध्वस्त करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us