
नॉन व्हेज खाणारे म्हणजेच मांसाहार करणारे चिकन आणि मटणावर ताव मारतात. चिकन आणि मटणापासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ मांसाहारी लोक आवडीने खातात. परंतु चिकन आणि मटण यापैकी कोणते मांस शरीरासाठी फायदेशीर असते, हे फारच कमी लोकांना माहिती आहे.

त्यामुळे कोणते मांस चांगले आहे? कोणत्या मांसातून किती प्रोटीन मिळते ते जाणून घेऊ या. चिकन ब्रेस्टमध्ये (चिकनच्या छातीचा भाग) फॅट्स कमी आणि प्रोटि जास्त असल्याचे सांगितले जाते. तुम्ही 100 ग्रॅम चिकन ब्रेस्ट खाल्ले तर त्यातून तुम्हाला साधारण 32 ग्रॅम प्रोटीन मिळते.

चिकन थायमध्ये कॅट्स जास्त तर प्रोटीन कमी असतात. 100 ग्रॅम चिकन थायमध्ये 24 ते 26 ग्रॅम प्रोटीन असते. तुम्हाला जाड व्हायचे असेल तर चिकन लेग खाणे चांगले असते. चिकनच्या तुलनेत मटणामध्ये प्रोटीन आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असतात.

मटणात फॅट्सचे प्रमाणही जास्त असते. दरम्यान, आता चिकन खाणे योग्य आहे की मटण खायला हवे, ते जाणून घेऊ या. तुम्हाला वजन आणि स्नायू वाढवायचे असतील तर तुम्ही चिकन खायला हवे. तसेच तुम्हाला ताकद वाढवायची असेल तर मटण खाणे योग्य आहे.

(टीप- या स्टोरीतील माहिती फक्त प्राथमिक स्वरुपाची आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.)