कोकणातून विमानाने गाठा पुणे, गणेशोत्सवापूर्वी सुरु होणार विमान
पुणे विमानतळावरुन देशातील विविध भागांत विमानसेवा दिली जाते. तसेच राज्यातील विविध शहरे पुण्याशी विमानाने जोडली जात आहे. पुणे उद्योग आणि शिक्षणाचे माहेरघर आहे. या ठिकाणी आयटी कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणावर राज्यातील युवक, युवती येतात. आता कोकणातील लोकांसाठी पुणे विमानाने जोडले जाणार आहे.
चिपी ते पुणे ही विमानसेवा Fly ९१ कंपनीतर्फे सुरू करण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी सिंधुदुर्गातील चिपी ते पुणे आणि पुणे ते चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे गणपतीला गावाकडे जाणाऱ्या कोकणातील लोकांना फायदा होणार आहे.
-
-
कोकणवासियांसाठी मोठी बातमी आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून आता पुणे विमानाने गाठता येणार आहे. येत्या २४ ऑगस्टपासून ही विमानसेवा सुरु होता आहे. गणेश चतुर्थीपूर्वी कोकणातील लोकांना पुणे विमानाने गाठता येणार आहे.
-
-
चिपी ते पुणे ही विमानसेवा Fly ९१ कंपनीतर्फे सुरू करण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी सिंधुदुर्गातील चिपी ते पुणे आणि पुणे ते चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे गणपतीला गावाकडे जाणाऱ्या कोकणातील लोकांना फायदा होणार आहे.
-
-
फ्लाय ९१ कंपनीतर्फे सुरुवातील आठवड्यातील २ दिवस विमानसेवा असणार आहे. त्यासाठी पुणे विमानतळ स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही विमानसेवा सुरु करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर त्याला यश आले आहे.
-
-
माजी मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी विमान प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालयाकडे चिपी ते पुणे विमानसेवा सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर आता संबंधित मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. गणेश चतुर्थी पूर्वी ही विमानसेवा सुरू होणार आहे.
-
-
पुण्यावरुन कोकणात जाण्यासाठी नियमित रेल्वे नाही. यामुळे पुण्यात असणाऱ्या कोकणातील लोकांना एसटी बसेसचा पर्याय असतो. परंतु आता विमानसेवा हा आणखी एक प्रकार सुरु होत असल्यामुळे कोकणातील लोकांना फायदा होणार आहे.