
अनेकदा सिबिल स्कोअर खराब असल्याचे कारण पुढे करत बँका कर्ज नाकारतात. एखाद्याने कधीच कर्ज घेतले नसेल तर त्याची खास पंचाईत होते. कधी कधी बँका त्यालाही कर्ज देण्यास मागेपुढे पाहतात.

पण सिबिल स्कोअर खराब असला तरी काही पर्याय उपलब्ध आहेत. त्याद्वारे तुम्हाला कर्ज मिळू शकते. वैयक्तिक कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला यामुळे अडचण येत नाही. या पर्यायामुळे तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते.

नॉन-बँकिंग फायनेन्शिअल कंपन्यांकडून (NBFC) तुम्ही कर्ज मिळवू शकता. कमी सिबिल असला तरी या कंपन्या ग्राहकाला कर्ज देण्यास तयार असतात. पण या वित्तीय संस्थांचे व्याजदर बँकांच्या तुलनेत अधिक असतो. त्यामुळे कर्ज घेण्याअगोदर तुम्ही इथून माहिती मिळवू शकता.

जर तुमच्याकडे सोनं असेल तर मग या सोन्यावर कर्ज घेण्याचा पर्याय तुमच्यासमोर आहे. सोने कर्जावरील व्याजदर अत्यंत कमी आहे. त्यासाठी तुमचा सिबिल स्कोर तपासण्यात येत नाही. सोन्याची शुद्धता तपासली जाते.

जर बँकेत तुमची एफडी असेल तर त्या मुदत ठेवीवर तुम्हाला कर्ज मिळवता येऊ शकते. एफडीवरील कर्जासाठी सिबिल स्कोअर तपासला जात नाही. एफडीवर जवळपास 90 टक्के कर्ज सहज मिळू शकते.

संयुक्त कर्ज खात्यामुळे कर्जासाठीची अडचण दूर होऊ शकते. ज्याचा सिबिल स्कोअर चांगला आहे, त्याच्यासोबत तुम्ही कर्जासाठी अर्ज करु शकता. पण त्या व्यक्तीची सहमती अत्यंत गरजेची आहे.