
CID मध्ये आदित्यने इंस्पेक्टर अभिजीतचा रोल साकारला आहे. खऱ्या आयुष्यात आदित्य विवाहित आहे. आरुषी आणि अद्विका या त्याला दोन मुली आहेत.

आदित्य श्रीवास्तवच लग्न मानसी श्रीवास्तव बरोबर झालं. दोघांच लग्न 2003 मध्ये झालेलं. 22 नोव्हेंबरला त्यांनी आपल्या लग्नाची 25 वर्ष साजरी केली.

सोशल मीडियावर त्यांचे वधू-वराच्या पोषाखातील फोटो व्हायरल झाले आहेत. ते पाहून असं वाटलं की ते पुन्हा लग्न करतायत.

नंतर समजलं की, ते लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी वधू-वरासारखे नटले होते. वेडिंग एनिवर्सरीला आदित्यने वाइफ मानसीसोबत रोमँटिक डान्स केला.

आदित्यला नवऱ्या मुलाच्या पोषाखात बघून सीआयडीचे फॅन्स खुश झाले. आतापर्यंत लोकांनी त्यांना सीआयडी कॅरेक्टरमध्ये पाहिलं आहे. पहिल्यांदा रोमँटिक अंदाजात पाहून फॅन्स सरप्राइज झाले. सीआयडी फक्त एक टीव्ही शो नाही. लोकांसाठी भावना आहेत. 90 च्या दशकापासून हा शो आणि त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर घराघरात लोकप्रिय झालं आहे.