
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. सानिया मल्होत्राच्या 'कटहल' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे.

शाहरुख खानला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याला 'जवान' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जीला तिच्या 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तिचाही हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे.

अभिनेता विक्रांत मेस्सीलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आपल्या 12th फेल या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून श्यामची आई या चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा म्हणून नाळ 2 या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.