
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा सिनेमा ओटीटीवर आल्यापासून अनेकांनी हा सिनेमा पाहिला. या सिनेमाचं कौतुक केलं.

या सिनेमात तीन पात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. जया, फुलकुमारी आणि दीपक... या तिघांची पात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. या तिघांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होत आहे.

प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याने या सिनेमावर भाष्य केलं आहे. सगळ्यांचं काम छान झालंय तसंच हा सिनेमा चांगला झाल्याचं तो म्हणाला. पण दीपक हे पात्र साकारलेल्या अभिनेता स्पर्श श्रीवास्तवचं काम प्रचंड आवडल्याचं आमीर खान म्हणालाय.

स्पर्शने दीपक हे पात्र खूपच चांगल्या प्रकारे साकारलं आहे. जितकं त्याचं पात्र कागदावर चांगलं लिहिलं होतं. त्याहून कैक पटीने स्पर्शने ते उत्तम प्रकारे साकारलं आहे, असं आमीर खान म्हणाला. त्याचं काम मनात घर करून गेलं, असं आमीरने एका मुलाखतीत सांगितलं.

'लापता लेडीज' या सिनेमातील दीपक हे पात्र अभिनेता स्पर्श श्रीवास्तव याने साकारलं आहे. त्याच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे. आमीर खानला देखील त्याचं काम प्रचंड आवडलं आहे. याआधी जमतारा या सिनेमात स्पर्शने काम केलं आहे.