Abhishek Bachchan च्या खात्यात एका झटक्यात आले 14.5 कोटी रुपये, अभिनेत्याने केली मोठी डील
Abhishek Bachchan Property Deal: बॉलीवुड अभिनेता अभिषेक बच्चन याला कशाची कमरता नाही. तो एक लक्झरीयस जीवन जगतो. त्याने त्याची एक संपत्ती तब्बल १४.५ कोटींना विकली आहे.

AbhiAbhishek Bachchan Property Deal: मेगा स्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन सतत बातम्यांमध्ये असतो. कधी त्याच्या पर्सनल लाईफ संदर्भात तर कधी प्रोफेशन लाईफबद्दल, आता तो एका प्रॉपर्टीच्या डीलवरुन चर्चेत आला आहे. shek Bachchan
अभिनेता अभिषेक बच्चन याच्या जवळ मुंबईतील महालक्ष्मी येथे एक डुप्लेक्स अपार्टमेंट होता.आता बातमी आहे की हा अपार्टमेंट त्याने विकला आहे. त्यामुळे त्याच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत.
बातमीनुसार त्याने हा फ्लॅट १४.५ कोटींना विकला आहे. हा डुप्लेक्स अपार्टमेंट महालक्ष्मीच्या गोदरेज प्लॅनेट नावाच्या इमारतीत होता. ४० व्या आणि ४१ व्या मजल्यावर हे डुप्लेक्स अपार्टमेंट आहेत, फ्लॅटसोबत तीन कार पार्किंग उपलब्ध आहेत.
६४ हजार ४७३ रुपये प्रति चौरस फूट दराने ही डील झाली आहे. या फ्लॅटचा एकूण क्षेत्रफळ २,२४९ चौरस फूट आहे. महालक्ष्मी हा भाग चांगला पॉश विभाग आहे, अभिषेकने जो प्लॅट विकला आहे तो खूपच लक्झरीयस आहे.
१२ फेब्रुवारीला अभिषेक बच्चन याने या मालमत्तेचा करार अंतिम केला आणि हे फ्लॅट १४.५ कोटी रुपयांना विकले. अभिषेक गेल्या २६ वर्षांपासून चित्रपट उद्योगात आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अमाप प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवले आहे. त्याची एकूण संपत्ती २८० कोटी रुपये आहे.