
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसाठी (Akshay Kumar) आजचा दिवस मोठं दुःख घेऊन आला आहे. अभिनेत्याची आई अरुणा भाटिया (Aruna Bhatia) यांचे आज (8 सप्टेंबर) निधन झाले.

स्वत: अक्षय कुमार याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे.

अक्षय त्याच्या आईच्या खूप जवळ होता, अभिनेता त्याच्या आईसोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे.

अशा परिस्थितीत आज त्याच्या आईच्या निधनाने अभिनेत्याच्या आयुष्यात मोठी दरी निर्माण झाली आहे.

अक्षयच्या आईचे त्याच्या वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी मृत्यू झाला. उद्या म्हणजेच 9 सप्टेंबरला खिलाडी कुमारचा वाढदिवस आहे.

आपल्या आईच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर अक्षय तातडीने परदेशातून शूटिंग सोडून भारतात परतला होता. अभिनेत्याच्या आईला हिरानंदानी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली आहे.