
कलर्स मराठीवरील 'घाडगे अँड सून' ही मालिका तुम्हाला आठवते का? या मालिकेतील सूनबाई अर्थात अभिनेत्री भाग्यश्री लिमये... भाग्यश्री आता हिंदी वेबसिरिजमध्ये झळकतेय.

'घाडगे अँड सून' मालिकेत आदर्श सुनेची भूमिका साकारणारी भाग्यश्री ही सध्या 'सिस्टर्सहूड' या वेबसिरिजमध्ये दिसतेय. अॅमेझॉन मिनी टीव्हीवर ही वेबसिरिज सध्या रिलीज झालीय.

शाळा आणि त्यातील गमती जमती या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळत आहेत. बहिणींमधलं नातंही या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळतंय.

शाळेतील आठवणी आणि बेस्ट फ्रेंड्स बनवायला येतेय गर्ल्स गँग..., असं म्हणत भाग्यश्रीने ही खुशखबर चाहत्यांना दिलीय. शाळकरी मुलीची भूमिका तिने साकारली आहे. या वेबसिरिजमधल्या कामाला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

'घाडगे अँड सून' या मालिकेत भाग्यश्रीने काम केलंय. त्यानंतर 'बॉस माझी लाडाची' या मालिकेतून भाग्यश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली. शिवाय भाडिपाच्या 'कांदेपोहे' या सिरिजमध्येही भाग्यश्री काम करतेय. आता 'सिस्टर्सहूड'मधून ती नव्याने चाहत्यांच्या भेटीला आली आहे.