
कलर्स मराठीवरील 'घाडगे आणि सून' मालिकेतील अमृता अर्थात अभिनेत्री भाग्यश्री लिमये... 'घाडगे आणि सून' मालिकेत भाग्यश्रीने साकारलेलं पात्र प्रेक्षकांना भावलं होतं.

'घाडगे आणि सून' या मालिकेत भाग्यश्रीने आदर्श सुनेचं पात्र साकारलं होतं. 2017 ते 2019 या काळात ही मालिका कलर्स मराठीवर प्रसारित होत होती. ही मालिका संपून आता पाच वर्षे झाली. त्यानंतर भाग्यश्रीच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे.

'घाडगे आणि सून' या मालिकेनंतर इतर अनेक प्रोजेक्टमधून भाग्यश्री लिमये प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'बॉस माझी लाडाची' ही तिची मालिका देखील प्रचंड गाजली. यातील तिचं पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

'मुंज्या' या बहुचर्चित सिनेमातही तिने काम केलं आहे. शिवाय अॅमेझॉन मिनी टीव्हीवरच्या 'सिस्टरहूड' या सिरिजमध्येही तिने काम केलं आहे. शाळकरी मुलीची भूमिका भाग्यश्रीने साकारली होती.

भाडिपा या यूट्यूब चॅनेलवर 'कांदे पोहे' नावाच्या सिरिजमध्ये भाग्यश्री झळकते. तिने साकारलेलं लग्नाळू मुलीचं कॅरेक्टर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे. भाग्यश्रीच्या लूकमध्येही आता बराच बदल झाला आहे.