
'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती अर्थातच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर... मधुराणीच्या मालिकेतील कामाला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

मधुराणी वेगवेगळ्या स्टाईलच्या साड्यांवर फोटोशूट करते. आताही तिने क्लासी साडीवर खास फोटोशूट केलं आहे. मोरपंखी रंगाच्या साडीत मधुराणीने हे फोटोशूट केलं आहे.

व्हाईट कलरचा शर्ट आणि मोरपंखी साडी असा हा ट्रेंडी लूक मधुराणीने केला आहे. या लूकला साजेसा असा गॉगलदेखील मधुराणीने घातला आहे. तिचा हा लूक सध्या चर्चेत आहे.

कधी- कधी मला हवं ते करत असते. इतर वेळी मला जे करायचे ते मी करते, असं म्हणत मधुराणीने हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या लूकला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे.

मधुराणीच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. तू विद्या बालन सारखी दिसत आहेस, अगदी रावडी लूक..., असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर तुझा अॅटिट्यूड मला आवडतो, अशी कमेंट मधुराणीच्या चाहत्याने केली आहे.