रात्री 3 वाजता एकटीलाच बोलावलं, त्या म्हाताऱ्याने… अभिनेत्री फुटला घाम, घेतला मोठा निर्णय

मनिषा राणीने तिच्या संघर्षाच्या सुरुवातीला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. एका वृद्ध व्यक्तीने तिला रात्री ३ वाजता घरी भेटायला बोलावले. मनिषाने हिंमत दाखवत त्याला नकार दिला, ज्यामुळे तिला घाम फुटला. कामाच्या बदल्यात होणाऱ्या गैरफायद्याला तिने ठामपणे विरोध केला, हे तिच्या प्रवासातील एक महत्त्वाचे वळण होते. तिने अशा प्रकारच्या शोषणाला वाचा फोडली आहे.

| Updated on: Nov 28, 2026 | 5:05 PM
1 / 6
अनेक कलाकार बॉलिवूडच्या आकर्षणानं मुंबईत येतात. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवून रातोरात प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात. पण सर्वांनाच यश येतं असं नाही. जवळपास सर्वच कलाकारांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. प्रसंगी उपाशी राहून दिवस ढकलावे लागतात. केवळ पुरुषच नव्हे तर स्त्री कलाकारांनाही या संघर्षातून जावं लागतं. महिलांसाठी तर परिस्थिती अत्यंत भयानक असते. मजबुरीचा फायदा घेणारे लोक पदोपदी असतात. अभिनेत्री मनिषा राणी हिलाही असाच एक धक्कादायक अनुभव आला होता. अनेक वर्षानंतर तिने हा अनुभव मांडला आहे.

अनेक कलाकार बॉलिवूडच्या आकर्षणानं मुंबईत येतात. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवून रातोरात प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात. पण सर्वांनाच यश येतं असं नाही. जवळपास सर्वच कलाकारांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. प्रसंगी उपाशी राहून दिवस ढकलावे लागतात. केवळ पुरुषच नव्हे तर स्त्री कलाकारांनाही या संघर्षातून जावं लागतं. महिलांसाठी तर परिस्थिती अत्यंत भयानक असते. मजबुरीचा फायदा घेणारे लोक पदोपदी असतात. अभिनेत्री मनिषा राणी हिलाही असाच एक धक्कादायक अनुभव आला होता. अनेक वर्षानंतर तिने हा अनुभव मांडला आहे.

2 / 6

मनिषा राणी ही बिहारच्या खेड्यातून निघून थेट इंडस्ट्रीत आली. नाव कमावलं. आज मनिषा ही केवळ टीव्ही इंडस्ट्रीच नव्हे तर सोशल मीडियातही स्टार बनली आहे. तिचे लाखो फॉलोअ्स आहेत. पण करिअरच्या या टप्प्यावर पोहोचण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. तिला खूप मेहनत करावी लागली, तेव्हा कुठे ती या टप्प्यावर आली आहे.

3 / 6

मनिषाला करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काऊचचाही सामना करावा लागला. Galatta India ला दिलेल्या मुलाखतीत तिने सुरुवातीच्या काळातील दाहक आणि अत्यंत वाईट अनुभव शेअर केला आहे. हा प्रसंग सांगताना ती स्वत: हादरून गेली होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव उडाले होते. तसेच हा प्रसंग कुणाच्या आयुष्यात येऊ नये असं म्हणताना ती दिसते.

4 / 6

काही लोकांनी कामाच्या बदल्यात तुला फेव्हर मागितलाय का? असा सवाल मनिषाला करण्यात आला. त्यावर तिने होकार दिला. एक व्यक्ती होता. त्याने माझे अनेक व्हिडीओ पाहिले. तू सिलेक्ट होशील असं त्याने मला सांगितलं. माझा आत्मविश्वास वाढवला. त्यानंतर एक टकला म्हातारा होता. तो 45-50 वर्षाचा असेल. त्याने कामाच्याबाबत मला बरीच आश्वासने दिली. मी बिहारमध्ये असताना तो माझ्या संपर्कात होता.

5 / 6

जेव्हा मी मुंबईत आले, तेव्हा तो मला भेटायला बोलावत होता. एकदा तर त्याने रात्री 3 वाजता मला फोन करून मला भेटायला बोलावलं. माझ्या घरी ये, असं तो मला म्हणाला. त्याचं बोलणं ऐकूनच मला घाम फुटला. हिंमत करून मी त्याला भेटायला नकार दिला. तुमच्या घरी येऊ शकत नाही, असं मी त्याला म्हणाले. त्यावर तो माझ्याशी रुडली बोलायला लागला. मी येणार नाही, असं बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? असा सवाल त्याने मला केला.

6 / 6

तुला मी इंडस्ट्रीत टिकू देणार नाही, असं म्हणून त्याने फोन कट केला. त्यानंतर मीही मोठा निर्णय घेतला. त्याचा नंबरच मी ब्लॉक करून टाकला. तो मला काही काम देणार नाही हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं, असं मनिषाने सांगितलं. मनिषा आज टीव्हीच्या दुनियेतील मोठी स्टार आहे. तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. प्रेक्षकांच्या हृदयस्थानावर मनिषा राज्य करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us