
अभिनेत्री परिणीती चोप्रा नेहमीच तिच्या फॅशन स्टाइल आणि अभिनयासाठी ओळखली जाते. नुकताच परिणीती मुंबई विमानतळावरून बाहेर येताना दिसली. नेहमीप्रमाणेच यावेळीही परिणीती खास लूकमध्ये दिसत होती.

परिणीतीने स्टायलिश लूक कॅरी केला होता. परिणीती अलीकडेच तिच्या कॅज्युअल ड्रेसिंग स्टाईलमध्ये दिसली होती.

विमानतळावर परिणीतीने ट्रेंडी ब्राउन शेडचा विंटर ड्रेस घातला होता. फुल स्लीव्हज, रिब्ड हेमलाइन, बॉडी स्किमिंग फिट आणि क्रॉप्ड लेंथ.

हिवाळ्याच्या हंगामात तुम्ही देखील हा ड्रेस ट्राय करू शकता. यादरम्यान परिणीतीने एक हँड बॅग देखील कॅरी केली होती. त्या बॅगची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, परिणीतीने जी हँड बॅग कॅरी केली आहे, तिची किंमत 1 लाख रूपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबद्दल कन्फर्म सांगणे अवघड आहे. खरोखरच ही बॅग जर 1 लाख रूपयांची असेल तर सर्वसामान्य लोकांच्या बजेट बाहेरची आहे.