
मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री पूजा सावंतनं नुकतंच काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्वानाच्या पिल्लांसोबत ती या फोटोंमध्ये पोज देत आहे.

या फोटोंसोबत पूजानं सुंदर कॅप्शनही दिलं आहे. तिनं लिहिलं, 'मला ब्रिड आणि इंडीज मधील फरक कधीच समजला नाही आणि मला त्यांना 'भटके' म्हणणे आवडतही नाही. मला कुत्र्यांची पिल्लं आणि मांजरीचे पिल्लू दत्तक घेण्याशिवाय ते 'खरेदी' करण ही संकल्पना कधीच समजली नाही ... फक्त आपल्या आजूबाजूला पाहा, कदाचित तेथे कोणीतरी आहे ज्यांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे - त्यांना मदत करा..'

पूजाची ही पोस्ट सध्या तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

आपल्या नाटयमय आणि नाविन्यपूर्ण चित्रपटांसाठी ओळखली जाणारी पूजा सावंत ही एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते. मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहऱ्यापैकी एक अशी ओळख असणारी अभिनेत्री पूजा सावंत या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पाऊल ठेवलं होतं. आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, निळकंठ मास्तर अशा हिट चित्रपटांमध्ये पूजाने अभिनय केला आहे.