
अभिनेत्री प्राजक्ता माळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर तिची परखड मतं मांडत असते. लग्न आणि प्रेम या गोष्टींवरही ती उघडपणे बोलत असते. आताही एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिचं लग्नाबाबतचं मत व्यक्त केलं आहे.

माझ्या आनंदात जर कुणी आणखी आनंद अॅड करणार असेल तर मी लग्न करेन. दु:ख आयुष्यात येणार असेल तर मी लग्न नाही करणार. डोक्या भुगा नको... डोक्याची मंडई होणार असेल तर मला लग्न नाही करायचं, असं प्राजक्ता म्हणाली.

मानसिक शांतता ही माझ्या आयुष्याची प्राथमिकता आहे. जर डोकंच जागेवर नसेल तर काम करायला सुचणार नाही. त्यामुळे मानसिक शांतता फार गरजेची आहे, असं प्राजक्ता म्हणाली.

तुमचा जोडीदार तुमचं आयुष्य बदलू शकतो. तुमचं भविष्य आर्थिक गणितं, मानसिक आरोग्य, आरोग्य सगळं तो बदलू शकतो. त्यामुळे लग्न हा खूप मोठा निर्णय आहे. खूप मोठी रिस्क पण आहे. त्यामुळे विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे, असं प्राजक्ता म्हणाली.

अनेकदा सामाजिक, शारिरिक, मानसिक आर्थिक गरजांसाठी मुली लग्न करतात. पण माझ्या त्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत. अध्यात्मामुळे तर माझ्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत. हे सगळं जिथं संपतं तिथं प्रेम आणि विश्वासाच्या जीवावर ते नातं टिकतं. त्यामुळेच तसाच जोडीदार हवा, असं प्राजक्ता माळीने सांगितलं.