
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही प्राजक्ताने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय.

कर्जतमध्ये प्राजक्ता हिचं 'प्राजक्तकुंज' हे फार्म हाऊस आहे. निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या या फार्म हाऊसवर प्राजक्ता माळी गेली होती. तिथले फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत.

लाडक्या भाच्यांना धेऊन प्राजक्ता माळी कर्जतच्या फार्महाऊसवर गेली आहे. तिने फार्महाऊसवर भाच्यांसोबत वेळ घालवला. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनीही पसंती दिलीय.

मी माझ्या घरच्यांना शब्द दिलाय की, प्रत्येक प्रोजेक्टनंतर शीण घालवायला इथेच येणार. माझं दुसरं लाडकं घर..., असं म्हणत प्राजक्ताने हे खास फोटो शेअर केलेत. 'फुलवंती' या सिनेमानंतर प्राजक्ता तिच्या भाच्यांसोबत वेळ घालवताना दिसली.

निसर्गाच्या सानिध्यात मन रमण्यासाठी प्राजक्तकुंज एकदम रमणीय ठिकाण आहे. इतका खर्च करून लोन घेऊन घर बांधलंय. तर आनंद तर घ्यायलाच पाहिजे! खूप शुभेच्छा!, अशा कमेंट प्राजक्ताच्या चाहत्यांनी केली आहे.