
शिवा ही मालिका सध्या प्रेक्षकांना आवडत आहे. या मालिकेतील आशु आणि शिवा यांची जोडी प्रेक्षकांना आवडते आहे. मालिकेतील या दोघांची मैत्री खास आहे.

शिवा आणि आशु यांची मालिकेतील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय. मात्र या दोघांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीदेखील भन्नाट आहे.

शिवा पात्र साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने इन्स्टाग्रामवर आशु म्हणजेच अभिनेता शाल्व किंजावडेकरसोबतचे फोटो शेअर केलेत.

पूर्वा आणि शाल्व या दोघांनीही ब्लॅक कलरचे कपडे घातलेत. 'पॉवर रेंजर्स' unplanned twinning... म्हणत पूर्वाने हे फोटो शेअर केलेत.

पूर्वा आणि शाल्व यांच्या फोटोंना नेटकऱ्यांची देखील पसंती दिली आहे. या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळतेय.