
रिंकू राजगुरू... महाराष्ट्राची क्रश... रिंकू म्हटलं की सिंपल पण तितकीच स्टायलिश पर्सनॅलिटी डोळ्यासमोर उभी राहते... तिचा लूक अनेकांना भावतो. महाराष्ट्राभरात तिचा चाहता वर्ग आहे.

आताचा रिंकूचा फोटो पाहता हिच ती सैराटमधली आर्ची आहे का? असा प्रश्न पडतो. पण सैराट सिनेमाच्या शुटिंग दरम्यान रिंकूचा लूक कसा होता? ती कशी दिसायची?

रिंकूने नुकतंच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. यात आठ वर्षांपूर्वीचा लूक तिने शेअर केलाय. सैराटला आज आठ वर्षे पूर्ण झाली…, म्हणत रिंकूने हे खास फोटो शेअर केलेत.

रिंकूचे हे फोटो पाहा... घोड्यावर बसलेली रिंकू तर दुसरीकडे स्टाईलमध्ये फोटोसाठी पोज देणारी रिंकू... सैराटच्या चित्रिकरणादरम्यानचा रिंकूचा हा लूक तुम्हाला कसा वाटला?

सैराट या सिनेमाने सामान्य घरातील रिंकू राजगुरुला 'हिरोइन' केलं. या सिनेमामुळे रिंकूला अभिनेत्री म्हणून ओळख दिली. रिंकू आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सैराट सिनेमातील रिंकूचे खास फोटो...