
अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) आपल्या नवनव्या फोटोंनी नेहमीच सर्वांना घायाळ करत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही अभिनेत्री आपले फोटो आणि व्हिडीओ या माध्यमांवर शेअर करत असते.

नुकतेच संस्कृतीने स्टनिंग ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट केले आहे. यातील काही फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

‘आय अॅम अवेअर दॅट अॅम रेअर' असं भन्नाट कॅप्शन देत संस्कृतीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्यासोबत एक काळ्या रंगाचा घोडा देखील दिसत आहे.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे ‘पिंजरा’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. आनंदीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतर विवाह बंधन, काळे धंदे यासारख्या तिच्या काही मालिका गाजल्या.

सांगतो ऐका चित्रपटातून तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं. शॉर्टकट, निवडुंग, एफयू, सर्व लाईन व्यस्त आहेत असे काही सिनेमेही गाजले.

अभिनय क्षेत्रासोबतच संस्कृतीने नृत्यांगना म्हणूनही नाव कमावलं आहे.