
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल हे 23 जूनला विवाहबद्ध झाले. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि जहीर यांचं रजिस्टर मॅरेज झालं. या दोघांच्या लग्नाची बी टाऊनमध्ये जोरदार चर्चा झाली.

सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता, अशी एक चर्चा रंगली होती. मात्र सोनाक्षीच्या लग्नात तिच्या घरचे उपस्थित होते. आज सोनाक्षीने तिच्या आई-वडिलांसोबतचे लग्नातील खास फोटो शेअर केलेत.

वडील शतृघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा यांच्यासोबतचे फोटो सोनाक्षीने शेअर केले आहेत. याला तिने भावनिक कॅप्शन दिलंय. तसंच लग्नानंतर तिच्या मनात नेमकं काय सुरु आहे? यावरही तिने भाष्य केलंय.

माझ्या लग्नात माझी आई रडायला लागली. तेव्हा तिला मी म्हटलं की अगं , जुहू आणि वांद्यात केवळ 25 मिनिटांचं अंतर आहे, रडू नकोस. पण आता माझ्या मनातील भावना तशाच आहेत. मी सगळ्यांना खूप मिस करतेय. तेव्हा मी मला स्वत: हेच वाक्य समजावलं, असं सोनाक्षी म्हणाली.

आपल्या घरी सिंधी कढी बनवलेली असेल.... तुम्हा सगळ्यांची आठवण येते. सगळ्यांना लवकरच भेटेन, अशी पोस्ट सोनाक्षीने शेअर केलीय. तिची हो पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे.