
अभिनेत्री अदिती राव हैदरी गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

पण आता अभिनेत्री तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. हिरव्या रंगाच्या साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदिती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. कोणत्याही कार्यक्रमात किंवा लग्न कार्यात तुम्ही अदिती हिचा खास लूक फॉलो करु शकता.

अदिती कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अदिती लवकरच 'हिरा मंडी' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

अदिती सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.