
बॉलिवूड अभिनेत्री नौहिद सेरुसीने आपल्या करिअरची सुरुवात म्यूझिक व्हिडीओ आणि जाहिरातींमध्ये काम करून केली. 2000 साली आलेला त्यांचा 'पिया बसंती रे' हा म्युझिक व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला. तेव्हापासून तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.

वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी नौहिदने पहिल्यांदा कॅमेऱ्याचा सामना केला होता, तिची पहिली जाहिरात विभाग रिफाइंड ऑइलची होती. 2007 साली मनीष झा दिग्दर्शित अन्वर चित्रपटाने नौहिदला एक नवीन ओळख दिली. त्या चित्रपटातील 'मौला मेरे मौला' या गाण्यात ती खूप निरागस आणि सुंदर दिसत होती.

नौहिद त्या काळातील सर्वात मोहक अभिनेत्रींपैकी एक होती. बरेच लोक तिला आपला क्रश मानत असत.

2014 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानच्या जय हो या चित्रपटात नौहिद दिसली होती. चित्रपट जगतात तिची सक्रियता आता खूप कमी झाली आहे.

सध्या नौहिद इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तिथे ती रील आणि फोटो शेअर करत असते. 21 वर्षानंतरही तिच्या निरागसपणा आणि सौंदर्यात फरक नाही.