
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान शुक्रवारी तुरुंगातून जामिनावर सुटणार आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना त्याच्या बाजूने निर्णय दिला. भाऊ आर्यन खानचा जामीन अर्ज मंजूर झाल्याची बातमी ऐकून सातासमुद्रापार बसलेली त्याची बहीण सुहाना खानला आनंद झाला आणि तिने भाऊ आर्यन आणि वडील शाहरुख खानसाठी तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली.

21 वर्षीय सुहाना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक अँड व्हाइट कोलाजमधील चार फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आर्यन खान आणि सुहाना खानच्या बालपणातील आहेत.

या फोटोंमध्ये शाहरुख खान देखील दिसत आहे. या फोटोंमध्ये शाहरुख खान आपल्या मुलांसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. त्याचवेळी आर्यन आणि सुहाना देखील एकमेकांसोबत खेळताना दिसत आहेत.

हा खास फोटो शेअर करत सुहाना खानने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले - आय लव्ह यू....

सुहाना खानच्या या पोस्टवर, तिच्या परिचितांनी तिला शुभेच्छा दिल्या आणि तिला मजबूत राहण्याची प्रेरणा दिली. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असलेल्या सुहाना खानने भाऊ आर्यनच्या ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून काहीही पोस्ट केले नव्हते. आर्यनच्या अटकेनंतरची ही तिची पहिली पोस्ट आहे. यापूर्वी सुहाना खानने तीन आठवड्यांपूर्वी तिची आई गौरी खानच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट केली होती. तिची आई गौरी खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा आणि वडील शाहरुख खानचा एक अतिशय रोमँटिक फोटो शेअर केला होता.