
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या बेल बॉटम या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह आज दिल्लीला रवाना झाला. बेल बॉटमचा ट्रेलर आज दिल्लीत लाँच होणार आहे. त्यामुळे चित्रपटाशी संबंधित सर्व स्टार्सला आज मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. पाहूया खास फोटो.

वाणी कपूर अक्षय कुमारसोबत मुंबई विमानतळावर पोहोचली होती.

वाणी कपूरसोबत अक्षय कुमारची जोडी सुंदर दिसत होती.

अक्षय कुमारचे संपूर्ण कुटुंब विमानतळावर दिसले, ट्विंकल खन्ना अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये दिसली.

लारा दत्ताही चित्रपटाच्या टीमसोबत दिल्लीला रवाना झाली.

या चित्रपटाचे निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानी देखील विमानतळावर दिसला.